Sanjay Raut News Today: 'कोशाहरी यांना त्यांच्या कृत्याची फळ लवकरच मिळतील'; मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV

Sanjay Raut on Eknath Shinde and Bhagat Singh Koshyari Meet: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल (२० मे) संध्याकाळी शिंदे यांच्या वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर आता शिंदे आणि कोश्यारी यांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका केली आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Narhari Zirwal Dance Video: झिरवाळ जोमात पब्लिक कोमात; थेट पत्नीला खांद्यावर घेऊन केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

काय म्हणले संजय राऊत?

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली तर आपल्याला कशाला त्यांच्यावर चर्चा करायची आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyrai) हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. घटनाबाह्य पद्धतीने काम करून त्यांनी हे सरकार आणलं. त्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील, असं राऊत म्हणाले. (Political News)

महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला जर मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut News
Mexico Gun Firing: अमेरिका पुन्हा हादरली; मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्यासाठी कोश्यारी यांनी घटनेचा गैरवापर केला. मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरेंना घालवण्यासाठी कोश्यारींनी घटनेचा गैरवापर केला हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. अशा माजी राज्यपालाला वर्षा बंगल्यावर बोलवून घटनाबाह्य मुख्यमंत्री भेटत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्या जागा वाढतील

गेल्या लोकसभेत शिवसेनेचे 19 खासदार होते. 18 महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्राबाहेर. आमचा लोकसभेतील 19 चा आकडा कायम राहील. कदाचित हा आकडा वाढू देखील शकतो. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू. त्यामध्ये कोणाला त्रास व्हायचं कारण नाही. आमचा सध्याचा आकडा कायम राहील त्यात कदाचित वाढ सुद्धा होऊ शकते,असंही त्यांनी सांगितलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com