Sanjay Raut: खासदार श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ल्याची सुपारी दिली; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut: या संदर्भात राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिले आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv

Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राज ठाकूरला सुपारी दिली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी मु़ंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

Sanjay Raut
Shiv Sena Symbol Row : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालयही शिंदे गटाला दिलं

या पत्रात संजय राऊत म्हणाले की, "प्रिय देवेंद्रजी, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात.

लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे." असे राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Sanjay Raut
BJP News : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 97% आमदारांची तिकीटं कापणार? भाजपचा मेगाप्लान तयार

पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले." (Latest Marathi News)

"मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, 'सामना'चा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे".

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com