Sangli News : ग्रामीण भागातील वयस्कर शेतकऱ्याचा नादच खुळा; वीजचोरी पथकासमोर इंग्रजीतून मांडल्या समस्या, Video

शेतकऱ्याने फाडफाड इंग्रजी बोलून वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांला अचंबित केले.
Sangli News
Sangli News Saam tv

Sangli viral news : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी गावच्या एका वयस्कर शेतकऱ्याने फाडफाड इंग्रजी बोलून वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांला अचंबित केले. अनेक वर्षापासून वीज कनेक्शन महावितरण देत नसल्याने आकडा टाकून वीज घेतली.

वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला इंग्रजी भाषेत आपली कैफियत मांडली. मात्र अधिकारी आणि या वयस्कर शेतकरी यांच्या या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

सांगलीच्या (Sangli) आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून शेती पंपासाठी होत असणारी वीजचोरी पकडण्यासाठी आटपाडी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता सुनील पवार हे पथकासोबत आटपाडी तालुक्यातील य.पा वाडी गावी दुपारी वीज चोरी पकडण्यासाठी गेले होते.

यावेळी य.पा.वाडी गावचे रहिवासी वेताळ चव्हाण हे वयस्कर शेतकरी हे आपल्या शेतामध्ये होते...त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

यावेळी वीजचोरी पकडण्यासाठी पथक आल्याचे समजले नंतर वयस्कर शेतकरी वेताळ चव्हाण यांनी पथकासोबत असलेले अधिकारी सहाय्यक अभियंता सुनील पवार याच्याशी इंग्रजी मधून संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

Sangli News
Viral News : अजबच ! चक्क YouTube ची मदत घेऊन तिने केली शेती, तब्बल 5 लाखांहून अधिक नफा

यावेळी अधिकारी सुनील पवार यांनीही वयस्कर शेतकरी चव्हाण यांच्याशी इंग्रजी मधून उत्कृष्ट संभाषण करत त्यांची बाजू ऐकून घेत वस्तुस्थिती विशद केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वेताळ चव्हाण यांना पहिल्यापासून इंग्रजी विषयाची आवड आहे. त्याचा इतिहास हा विषय आहे. पण इंग्रजी त्यांना चांगले जमते.

Sangli News
Viral News :'बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं...'; रडत रडत मुलीने केला थेट पोलिसांना फोन, त्यांनी दिलेले उत्तर होतंय व्हायरल

यावेळी एक वयस्कर शेतकरी (Farmer) आणि अधिकारी यांच्यात इंग्रजी मध्ये झालेले संभाषण पथकातील कर्मचारी यांनी चित्रित केले असून चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून समाज माध्यमातून याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com