आज संतभार पालख्या वाखरीत दाखल होणार

मानाच्या दहा पालख्या आज दुपारी वाखरी येथील पालखीतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर मानाच्या पालखीतील चारशे वारकरी विठुनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.
आज संतभार पालख्या वाखरीत दाखल होणार
आज संतभार पालख्या वाखरीत दाखल होणारभारत नागणे

पंढरपूर - आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रमुख मानाच्या दहा पालख्या आज दुपारी वाखरी wakhari येथील पालखीतळावर Palkhi दाखल होणार आहेत. त्यानंतर मानाच्या पालखीतील चारशे वारकरी विठुनामाच्या गजरात पंढरपूरकडे Pandparpur प्रस्थान ठेवणार आहेत. संत भार Sant Bhar वाखरीत आल्यानंतर संत नामदेवांची पालखी संतांच्या भेटीला पंढरपुरातून वाखरी येथे येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी पायी सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान प्रमुख मानाच्या दहा संतांच्या पालख्या एसटी बसने पंढरपूर कडे येणार आहेत. हा सगळा संत भार आज दुपारी तीन वाजता वाखरी येथील पालखीतळावर दाखल होणार आहे . आषाढी यात्रेचा सोहळा चारशे वारकऱ्यांच्या उपस्थित प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होणार आहे. वाखरी ते विसावा मंदिर या दीड किलोमीटर अंतरापर्यंत हे सगळे वारकरी पायी जाणार आहेत .

हे देखील पहा -

पुढे प्रत्येक पालखीतील दोन वारकरी आपापल्या मठा पर्यंत पायी वारी करणार करतील. यादरम्यान, भाविकांची किंवा स्थानिक लोकांची गर्दी होऊ नये यासाठी पंढरपूर ते वाखरी दरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला आहे. या मार्गावर पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.

आज संतभार पालख्या वाखरीत दाखल होणार
मोठ्या प्रतिक्षेच्या पावसानंतर सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपण सुरु

उद्या पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. महापूजेसाठी मुख्यमंत्री आपल्या कुटुंबियासह आज रात्री पंढरपूर मध्ये मुक्कामी येणार आहेत.आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावांमध्ये 25 जुलै पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. बाहेरगावच्या लोकांना पंढरपूर शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे यासाठी पोलिसांनी त्रिस्तरीय नाका-बंदी देखील केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com