Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

दिंडीक-यांच्या मागणी नुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील अशी ही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी दिली.
wari
wari saam tv

पंढरपूर : गेली दाेन वर्ष काेविड १९ मुळे (covid19) आषाढी पायी वारीचा (wari) सोहळा हाेऊ शकला नव्हता. केवळ हाताच्या बाेटावर मोजण्या इतक्याच वारकऱ्यांना परवानगी देत ही परंपरा सुरु ठेवण्यात आली हाेती. सध्या काेविड १९ चे रुग्ण घटल्याने राज्य शासनाने बहुतांश निर्बंध हटविले आहेत. त्यापार्श्वभुमीवर यंदा पायी वारीचे वेळापत्रक आज (बुधवार) जाहीर करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाचे प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील यांनी दिली . ढगे म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साेहळा (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala) २१ जूनला पंढरपूरकडे (pandharpur) प्रस्थान करेल. हा पालखी साेहळा सातारा (satara) जिल्ह्यातील लोणंदमध्ये (lonand) येथे अडीच दिवस तसेच फलटण (phaltan) येथे दोन दिवस मुक्कामी करेल असे ढगे यांनी नमूद केले. (pandharpur wari latest marathi news)

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ अभय टिळक , ह.भ.प नामदेव महाराज वासकर , राणू महाराज वासकर , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर , दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी , सचिव मारुती कोकाटे , बाळासाहेब रंदवे , भागवत चवरे , भाऊ फुरसुंगीकर , सोपानकाका टेंबुकर , गुरुजीबुवा राशिनकर , शरद गायकवाड , बाळासाहेब उकळीकर , एकनाथ हांडे , दिनकर वांजळे , राजाभाऊ थोरात , बाळासाहेब वांजळे , व्यवस्थापक माऊली वीर , सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते.

wari
Philippines: भूस्खलन, पुरामुळे ४३ ठार; लष्कराचे बचाव कार्य वेगाने सुरु

असे आहे आषाढी (ashadhi wari) पायी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी येथून २१ जूनला सायंकाळी चार वाजता प्रस्थान.

२२ व २३ ला पुणे (pune)

२४ व २५ ला सासवड (saswad)

२६ ला जेजुरी (jejuri)

२७ ला वाल्हे (walhe)

२८ व २९ ला लोणंद (lonand)

३० ला तरडगांव (taradgoan)

१ व २ जुलै फलटण (phaltan)

३ ला बरड (barad)

४ ला नातेपुते (natpute)

५ ला माळशिरस (malshiras)

६ ला वेळापूर (velapur)

७ ला भंडीशेगाव (bhandishegav)

८ ला वाखरी (vahkari)

९ ला श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल.

१० जुलैला आषाढी एकादशीचा महासोहळा होईल.

पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे ( सदशिवनगर ) , पानीव पाटी , ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होईल.

wari
'पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजप असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन'

पाच लाख भाविक साेहळ्यात सहभागी हाेण्याची शक्यता

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे २५१ दिंड्या नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणी नसलेल्या १२५ ते १५० दिंड्या आहेत. सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील. वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने १५ मे पर्यंत वाहनांचे नंबर, वाहन चालकाचे नाव व मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत. यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख भाविक राहिल. त्यादृष्टीने पालखी तळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता व सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल असं पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे- पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com