चंद्रभागा नदीत दोघा भावांनी मारली उडी, बचाव पथकाच्या जवानांनी पाहिलं, त्यानंतर...

गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.
Chandrabhaga river
Chandrabhaga riversaam tv

अकोला : गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रभागा नदीची (chandrabhaga river) पाण्याची पातळीही वाढली आहे. मात्र, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून पूराच्या पाण्याजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु, चंद्रभागा नदीत दोन तरुण पाण्यात उतरल्याने (Water Drowning) त्यांचा जीव धोक्यात होता. पाण्यात बुडून काळाने घाला घालण्याआधीच अकोल्याच्या पिंजरच्या संत गाडगे महाराज आपत्कालीन बचाव पथकाने (Rescue Team) धा़डसी कार्य करुन दोन भावांना वाचवलं आहे. जितेंद्र अजयकुमार कहाळ आणि अभिजीत अजयकुमार कहाळ अशी दोघा भावांची नावं आहेत.

Chandrabhaga river
वसईत दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदीपात्रात जितेंद्र आणि अभिजीत या दोघा भावांना पाण्यात बुडताना बचाव पथकाने पाहिलं. त्यानंतर तातडीने आपत्कालीन बचाव पथकाच्या जवानांनी पाण्यात उडी मारून दोघांना वाचवलं. दोघेही पाण्यात बुडत असताना जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पाण्याबाहेर येता आलं नाही. परंतु बचाव पथकाच्या जवानांना या दोन भावांना वाचवण्यात यश आलं आहे.

Chandrabhaga river
OBC Reservation :मोठी बातमी! अर्ज भरले नसतील तिथे निवडणूका पुढे ढकला; सुप्रीम कोर्टाचे आदेश

आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे अन् त्यांच्या जवानांनी जीवाची बाजी लावत या दोन तरुणांचा बचाव केल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केलं जात आहे. आषाढी एकादशीपासून अकोल्यातील हे पथक पंढरपुर येथे सामजिक कार्य करत असून पाण्यात बुडणाऱ्या पाच लोकांना त्यांनी वाचवलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com