
Sangli News : अत्यंत संवेदनशील रोमहर्षक निवडणूक झालेल्या सांगली येथील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Atapadi Krushi Utpanna Bazar Samiti) कोणाचे वर्चस्व राहणार याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले होते. अखेर सभापती निवडीमध्ये बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. या बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संतोष पुजारी (santosh pujari) तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड (rahul gaikwad) यांची निवड झाली आहे. (Maharashtra News)
शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी धक्कातंत्राचा वापर करत गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये विरोधकांना गाफील ठेवत 10 विरुद्ध 8 मताने विजय मिळविला. या निवडणुकीत 9-9 समान जागा निवडून येऊनही शिवसेनेने बाजार समितीवर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का दिला आहे.
सभापती निवडीमध्ये भाजपा- राष्ट्रवादीच्या युतीकडून सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख तर उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांनी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व रासपाच्या आघाडीकडून सभापती पदासाठी शिवसेनेच्या संतोष पुजारी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता.
दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने गुरुवारी दुपारी दोन वाजता गुप्त मतदान पार पडले. मतदानांतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या संतोष पुजारी व काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांना प्रत्येकी दहा तर राष्ट्रवादीच्या हणमंतराव गायकवाड व दादासाहेब हुबाले यांना प्रत्येकी आठ मते मिळाली.
आटपाडी तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्हयाचे लक्ष आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे लागले होते. सकाळपासून निवडीकडे लोकांची उत्सुकता ताणली होती. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आटपाडी शहरातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.