Viral News : सपना चौधरीच्या गाण्यावर बेभान होऊन नाचली तरुणी; गौतमीलाही टाकलं मागे, पाहा VIDEO

एका तरुणीचा लग्नाच्या वरातीमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Girls Dance Viral Video
Girls Dance Viral VideoSaam TV

Girls Dance Viral Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नात डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशाच एका तरुणीचा लग्नाच्या वरातीमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  (Latest Marathi News)

Girls Dance Viral Video
Viral Video : विमानात हवाईसुंदरीसोबत प्रवाशाचे गैरवर्तन; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

या व्हिडीओमध्ये ही तरुणी सपना चौधरीच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. तरुणीच्या डान्स स्टेप पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. या  व्हिडीओला (Viral Video)ला अनेकांनी पसंती दिली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Breaking Marathi News)

व्हिडीओत काय आहे?

लग्नात डीजे वाजू लागला की अनेकांचे पाय आपोआप थिरकायला लागतात. असंच या तरुणीसोबतही घडलं. लग्नाची वरात सुरू असताना, अचानक सपना चौधरीचं गाणं वाजू लागलं. आणि एक तरुणी स्टेजवर येऊन नाचू लागली.

या तरुणीने पूर्ण श्रृंगार केल्याचं दिसून येत आहे. पिवळ्या रंगाची साडी, मोठं मंगळसुत्र, हातात बांगड्या असा लग्नाला आल्याच्या लूकमध्ये ही तरुणी दिसते.'तेरी आंख्या का यो काजल' या गाण्यावर तरुणी जोरदार डान्स करताना दिसून येत आहे.

दरम्यान, तरुणीचा हा डान्स बघून वऱ्हाडी मंडळी सुद्धा हैराण झाले. त्यांनी टाळ्या वाजवून तरुणीच्या डान्सला दाद देत आहेत. डान्सचा हा व्हिडीओ कॅट श्रद्धा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी या तरुणीचं कौतुक केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com