
अमर घटारे
Political News : शेती देशाचा महत्वाचा प्रश्न आहे. या देशाला स्वतंत्र मिळाले तेव्हा 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून होते. उत्पादन घेत होते मात्र जमिन अजून वाढलेली नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. (Agriculture)
आज कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. राज्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे. अशात सध्या विविध विकासकामांमुळे शेतीसाठी पुरेशी जमिनही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या मुद्दायवरून शेती विषयी पवारांनी उपस्थित व्यक्तींना मार्गदर्शन केलं आहे.
समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
देशात 56 टक्के जमीन पिकाखाली आहे. दिवसेंदिवस 56 टक्क्यांचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात समृद्धी महामार्ग झाला त्यात जमीन ही शेतकऱ्यांची गेली व जमिन कमी झाली.विकासाचे प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांची जमिन घेतली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनची जमिन कमी होत आहे. लोकसंख्या वाढते व जमीन कमी होते आहे मग शेती कशी होणार?, असा प्रश्न शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पंजाबमध्ये 91 टक्के जमिन आणि 81 टक्के पाणी आहे पण महाराष्ट्रामध्ये 38% पाणी शेतीला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आम्ही आमच्या काळात 78 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. शेतकाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन नाही, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या शेतीला भाव नसेल तर त्याला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. मी मंत्री पद सोडलं तेव्हा जगातला तांदूळ निर्माण करणारा भारत पहिला देश होता. तसेच जगात गहू उत्पादन करणारा भारता देश दुसऱ्या क्रमांकावर होता, असंही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.