Dhule Nandurbar Bridge
Dhule Nandurbar BridgeSaam TV

Dhule Nandurbar Bridge: चार कोटी पाण्यात! 3 राज्यांना जोडणारा तापी नदीवरील पूल कोसळला

Sarangkheda Bridge Collapses: पूलाच्या सोशल ऑडिट झाला आहे की नाही? असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Nandurbar Bridge News:

तापी नदीवरील सारंगखेडा येथील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नुकतीच या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटी रुपये खर्च केले. मात्र हा पूल कोसळला असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. (Latest Marathi News)

Dhule Nandurbar Bridge
Nashik Water Supply: नाशिककर, पाणी जपून वापरा... 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा राहणार बंद; कारण काय?

या पुलावरून दररोज हजारो वाहने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात येजा करत असतात. वाहतूक बंद केल्यानंतर पूल तुटल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सदर घटना घडल्यानंतर आता नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पूलाचे सोशल ऑडिट झाले आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

काल रात्री पडला खड्डा

धुळे नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा पुलावर काल एक छोटे भगदाड पडले होते. रात्रीतून हा खड्डा वाढला. मोठा खड्डा तयार झाल्याने पूल तुटतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. कोणतीही दुर्घटना घडूनये यासाठी पोलीस प्रशासनाने येथील वाहतूक बंद केली होती.

आता हा पूल पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नागरिकांना शंभर किलोमीटर लांबून फेरा मारून जावे लागत आहे. कालपासून मध्यप्रदेश आणि सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे तापी नदीचा पाणी प्रवाह वाढलाय. तसेच सारंगखेडा येथील तापी नदीवर ब्रिटिशकालीन पूलाला मोठा खड्डा पडला. वेळीच वाहतूक बंद केल्याने पूल कोसळल्यानंतर होणारी मोठी दुर्घटना टाळता आली आहे.

Dhule Nandurbar Bridge
Lower Parel Bridge: मुंबईकरांच्या वाहतुक कोंडीची चिंता मिटली, 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'डीलाईल रोड ब्रिज' वाहतुकीसाठी खुला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com