महिला ग्रामपंचायत सदस्यासह कुटुंबास मारहाण; सरपंचावर गुन्हा

crime
crime

हिंगोली : पारधी समाजातील कुटुंबास ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकाला जाब का विचारला याचा राग मनात धरून सरपंचासह आठ जणांनी लाठया काठ्यानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे टोळके आई वडिलांना मारहाण करत असताना त्यांच्या चिमुकलीने मोबाईल कॅमेऱ्यात य़ा घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता तिला देखील या गावगुंडांनी मारहाण केली. sarpanch-beats-grampanchayat-member-women-in-hingoli-crime-news-sml80

या घटनेत मारहाण करण्यात आलेली महिला ज्योती पवार या खरबी गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून काही महिन्यांपूर्वीच निवडून गेल्या आहेत. ग्रामसभेत कोणतेही प्रश्न विचारायचे नाही म्हणत सरपंच या महिलेवर नेहमी दबाव टाकायचे यातूनच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

crime
साकीनाक्यातील क्रूरकर्त्यास देहदंडाची शिक्षा द्या : उदयनराजे

या प्रकरणी सरपंचासह इतर सात जणांवर गुन्हा crime दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आल्याचे पाेलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com