सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या

पतीसह सासरच्या तिघांना अटक
सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्याअभिजीत सोनावणे

नाशिक - महिला सरपंचाने राहत्या घरी विषारी औषधीचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द गावातली ही धक्कादायक घटना आहे. ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच योगीता अनिल फापाळे यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. त्यानंतर योगीता यांच्या पतीने त्यांना उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु तपासणी दरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला होता.

हे देखील पहा -

दरम्यान, मयत महिला सरपंचाच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करण्यात यते होता.

सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
बदलापुरात अनधिकृत नळजोडण्या तोडणार

योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरुण पती अनिल बाबासाहेब फापाळे,सासरे बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपस सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com