Satara Accident News: साताऱ्यातील खंबाटकी घाटात भीषण अपघात; कंटनेरखाली चिरडून तरुण-तरुणी ठार

Satara Accident News: साताऱ्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील खांबाटकी घाटात कंटेनर खाली चिरडून दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे.
Banjara Teej Mahotsav 2023 Accident News
Banjara Teej Mahotsav 2023 Accident Newssaam tv

Satara Accident News

साताऱ्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील खांबाटकी घाटात कंटेनरखाली चिरडून दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. खंबाटकी घाटातील एस कॉर्नर परिसरात अपघात घडला आहे. या अपघातात तरुण-तरुणी ठार झाले आहेत. या घटनेने अपघातस्थळी एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील खंबाटकी घाटाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. खंबाटकी घाट संपल्यानंतर एस कॉर्नर परिसरात तरुण-तरुणीचं वाहन रस्त्यावर घसरून कंटेनरखाली गेल्याची घटना घडली आहे. एस कॉर्नर परिसरात झालेल्या अपघातात तरुण-तरुणीचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. या भागात रस्ता दुरुस्तचंही कामे सुरू आहे.

Banjara Teej Mahotsav 2023 Accident News
Kalyan Crime News: कल्याणमध्ये चाललंय काय? टोळक्यांकडून तरुणासह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

एस कॉर्नर अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अपघातस्थळी पोहोचण्यासाठी धाव घेतली आहे. अद्याप या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण-तरुणीचे नाव समोर आलेले नाही.

परभणीत आंदोलकांचा टेम्पो उलटला

दरम्यान, परभणीतही अपघाताची मोठी घटना घडली. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठीच्या छत्रपती संभाजीनगरमधील मोर्च्यातून परतणाऱ्या आंदोलकांचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयात आले आहे.

या मोर्च्यात सहभागी होऊन सुकळी येथे परतणाऱ्या टेम्पोतील आंदोलकांचा लिंबाळा शिवारात अपघात झाला. अपघाताची ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातात 35 महिला 5 पुरुष जखमी झाले. या अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com