साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक अमूल्य ठेवा

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवकालीन दगडी चौथरा सापडला असून या चौथऱ्याचा बाजूलाच एक ब्रिटिश कालीन भली मोठी लोखंडी पेटी सापडली आहे
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक अमूल्य ठेवा
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवकालीन दगडी चौथरा सापडला असून या चौथऱ्याचा बाजूलाच एक ब्रिटिश कालीन भली मोठी लोखंडी पेटी सापडली आहे- Wikimedia

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाऱ्या सातारा Satara जिल्ह्यात इतिहासाच्या History अनेक खुणा सापडत असतात. स्वराज्याच्या या राजधानीच्या किल्ल्यावर आता राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम घेतली होती. या मोहीम दरम्यान स्वछता करत असताना काही ठिकाणी उत्खनन केले. Satara Ajinkyatara Historical Items found

या उत्खननात शिवकालीन दगडी चौथरा सापडला असून या चौथऱ्याचा बाजूलाच एक ब्रिटिश कालीन भली मोठी लोखंडी पेटी सापडली आहे. सातारा शहर ज्यांनी वसवले ते छत्रपती थोरले शाहू महाराज Shahu Maharaj यांच्या काळातील हा दगडी चौथरा असल्याचा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच ही जी लोखंडी पेटी सारखी दिसणारी तिजोरी आहे ती इंग्रजांच्या British काळातील असल्याचा प्रथम अंदाज आहे. या तिजोरीत त्या काळात बंदुकांची Gun काडतुसे,खजिना किंवा कागदपत्रे ठेवली जात असावीत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवकालीन दगडी चौथरा सापडला असून या चौथऱ्याचा बाजूलाच एक ब्रिटिश कालीन भली मोठी लोखंडी पेटी सापडली आहे
सांगलीकरांनाे! घरा बाहेर पडू नका; पाेलिसांचे आहे लक्ष

अशाच आणखी दोन तिजोऱ्या चौथऱ्याजवळ असणाऱ्या ढिगाऱ्यात असून आता त्या लवकरच बाहेर काढल्या जातील.राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या माध्यमातून सध्या जिल्ह्यातील चार ते पाच ठिकाणी स्वछता मोहीम सुरू आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com