पार्किंगवरुन साताऱ्यात पुन्हा राडा; गाड्या फाेडल्याची तक्रार

पार्किंगवरुन साताऱ्यात पुन्हा राडा; गाड्या फाेडल्याची तक्रार
CrimeSaam Tv

सातारा : साताऱ्यातील अमर लक्ष्मी परिसरात पार्किंगच्या वादातून एकाने दोन चार चाकी आणि दोन दुचाकी फोडण्याचा प्रकार crime घडला आहे. अश्विन गायकवाड असे संशयिताचे नाव आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास संशयिताने लोखंडी रॉडच्या सहाय्याने वाहनाच्या काचा फोडून मोठे नुकसान केले आहे.

Crime
बाप्पाच्या विसर्जनासाठी कराडच्या तहसीलदारांचा नवा आदेश

प्राथमिक माहितीनुसार पार्किंगमध्ये वाहन लावण्याच्या झालेल्या वादाचा राग डोक्यात घेऊन संशयित व्यक्तीने वाहने फोडल्या असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याप्रकरणी संशयित अश्विन गायकवाड याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पाेलिस या घटनेचा सखाेल तपास करीत आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com