सातारा : 29 बाधितांचा मृत्यू; महाबळेश्वरात एक रुग्ण आढळला

सातारा : 29 बाधितांचा मृत्यू; महाबळेश्वरात एक रुग्ण आढळला
corona update

corona update सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात आज (रविवार) 821 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. याबराेबरच 29 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (satara-corona-update-karad-hotpsot-mahableshwar-registered-1-case-slm80)

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात वाढती साखळी तुटत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढताना दिसत आहे. याचबरोबर संस्थात्मक विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण स्थिर असून, कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील उपचारार्थ रुग्णांची संख्याही दहा हजारांच्या जवळपास पोचल्याने चिंतेत आणखीनच भर पडत आहे.

गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या कमी झाल्याने ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन कमी केले होते. मात्र, पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने कंटेनमेंट झोन, कोविड सेंटर व संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये वाढ करण्यात आली आहे, तसेच जिल्ह्यातील सातारा व कऱ्हाड तालुके अद्यापही हॉटस्पॉटवर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अकरा हजार 757 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 821 बाधित आढळले आहेत. याचबरोबर कऱ्हाड तालुक्‍यात सर्वाधिक 230, तर सातारा तालुक्यात 189 बाधित आढळले आहेत. कऱ्हाड तालुक्यात 15 तसेच साता-यात तालुक्यात पाच बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

corona update
Chembur Live : मदत लगेच द्या; राजकारण करु नका! रहिवासी आक्रमक

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे : जावली 20 (9047), कराड 230 (32364), खंडाळा 43 (12490), खटाव 51 (20777), कोरेगांव 57 (18139), माण 22 (13928), महाबळेश्वर 1 (4422), पाटण 15 (9300), फलटण 95 (29612), सातारा 189 (43347), वाई 88 (13626) व इतर 10(1539) असे आज अखेर एकूण 208591 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज (रविवार) मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे : जावली 3 (188), कराड 15 (976), खंडाळा 1 (158), खटाव 1 (494), कोरेगांव 2 (392), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2(314), फलटण 0 (489), सातारा 5 (1278), वाई 0 (310) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5043 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.