Corona Update : खटाव, फलटण, सातारासह वाईतील बाधितांचा मृत्यू

Corona Update : खटाव, फलटण, सातारासह वाईतील बाधितांचा मृत्यू
corona update

सातारा : सातारा जिल्ह्यात गत 24 तासांत 886 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबराेबरच आठ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काेराेना बाधितांची मृत्यूची संख्या घटू लागल्याने नागरिकांमधील भिती दूर हाेऊ लागली आहे. (satara-coronavirus-update-eight-covid19-patients-died-sml80)

काेविड 19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या corona update तसेच आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 29(9130), कराड 220 (33155), खंडाळा 44 (12666), खटाव 53 (21094), कोरेगांव 64(18376), माण 74 (14208), महाबळेश्वर 3(4449) पाटण 36(9387), फलटण 95 (29946), सातारा 181(43925), वाई 80(13880) व इतर 7 (1574) असे आज अखेर एकूण 211790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

corona update
Live : चिपळुणात बचाव कार्यास प्रारंभ : विजय वडेवट्टीवार

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (191), कराड 0 (993), खंडाळा 0 (160), खटाव 3 (503), कोरेगांव 0 (396), माण 0 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0 (316), फलटण 2 (494), सातारा 1 (1295), वाई 2 (315) व इतर 0 (71) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5110 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com