Satara Crime News: राहत्या घरात मारहाण करत महिलेवर फेकलं अ‍ॅसीड; साताऱ्यातील थरारक घटना

Acid Attack: मारहाण करत या नराधमाने महिलेवर ऍसिड फेकत क्रूरतेचा कळस गाठला आहे.
Satara News
Satara NewsSaam TV

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Satara News: आजवर कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शासनामार्फत महिलांवरील अन्याय अत्याचार कमी होण्यासठी कठोर कायदे करण्यात येत आहेत. मात्र तरी देखील अद्यापही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. सातारा येथून अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या राहत्या घरात पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करत या नराधमाने महिलेवर ऍसिड फेकत क्रूरतेचा कळस गाठला आहे. याप्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara News
Satara Crime News: धक्कादायक! डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात

सविता सुनील पैठणे असे पीडित महिलेचे नाव आहे. राहत्या घरी मारहाण करत तिच्यावर ॲसिड फेकण्यात आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार हे पुढील तपास करत आहेत.

शारीरिक अन् मानसिक छळ करून ट्रिपल तलाक

पुण्यात (Pune) देखील अशीच एक एकघटना समोर आली आहे. विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने पतीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.Divorce

Satara News
Dombivli Crime : तिघांनी एकत्र दारू ढोसली, नंतर मित्राची हत्या केली; पुन्हा त्याच जागेवर पेग भरले

या संदर्भात २३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेवर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीने तीन वेळेस तलाक (Divorce) म्हणत नांदवण्यास नकार दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com