सातारा DCC बॅंक निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपाची दिलजमाई

सातारा जिल्ह्यात आज (रविवार) जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदानास प्रारंभ झाला.
सातारा DCC बॅंक निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपाची दिलजमाई
bjp-ncp leaders from karad gathered togther before satara dcc election voting begins

कराड : राज्यात सक्षम बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र आल्याचे आज (रविवार) स्पष्ट झालं. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उमेदवार असणाऱ्या सोसायटी मतदार संघात भाजपने राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी केल्याचं स्पष्ट झालं.त्यामुळे सातारा (satara ) जिल्ह्यातील कराड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपचे नेत्यांची मैफल जमलेली दिसली. bjp ncp leaders from karad gathered togther before satara dcc election voting begins

bjp-ncp leaders from karad gathered togther before satara dcc election voting begins
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

डॉ. सुरेश भोसले, भाजपा नेते डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे यशराज पाटील, ऍड. आनंदराव पाटील ही नेहमी एकमेकाच्या विरोधात असणारी मातब्बर नेते मंडळी मतदान केंद्राबाहेर एकत्र गप्पा मारताना दिसली. या निवडणुकीमुळे कराड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे स्पष्ट झाले.

सातारा जिल्ह्यात आज (रविवार) जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदानास प्रारंभ झाला. जावळी वगळता ठिकठिकाणी मतदान शांततेत सुरु आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com