DCC अध्यक्षांचा सत्कारानंतर रामराजे म्हणाले, बरच काही घडून गेलं

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालया बाहेर फटाक्यांची आतीषबाजी.
DCC अध्यक्षांचा सत्कारानंतर रामराजे म्हणाले, बरच काही घडून गेलं
ramaje naik nimbalkar

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीत सर्वांनी माेलाचा वाटा उचलावा असे आवाहन ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी नमूद केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (dcc bank) नूतन अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अनिल देसाई यांचे नूतन संचालक मंडळाने अभिनंदन केले. त्यावेळी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर ramaje naik nimbalkar बाेलत हाेते. satara dcc bank latest news

ramaje naik nimbalkar
काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले प्रथेप्रमाणे आज जिल्हा बॅंक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणुक बिनविराेध झाली आहे. आता पॅनलचे विषय संपले आहेत. आतले-बाहेरचे सगळं संपलं आहे. आपली जिल्हा बॅंक आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी नेतील याकडे लक्ष देणार आहाेत. जगातील राेबाे बॅंकेशी तुलना व्हावी यासाठी सर्व सहका-यांचे पाठबळ मिळावे. दरम्यान बरच काही घडून गेलं आहे असे म्हणत रामराजे यांनी आता त्याकडे विषयाकडे न जाता बॅंकेच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शिवेंद्रसिंहराजेंनी मनाचा माेठेपणा दाखवून हे सगळं घडवून आणलं. त्यांचे मी आभार मानताे असे रामराजेंनी नमूद केले.

यावेळी खासदार उदयनराजे भाेसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भाेसले, प्रदीप विधाते, रामभाऊ लेंभे आदी उपस्थित हाेते. यावेळी विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या समर्थकांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालया बाहेर फटाक्यांची आतीषबाजी केली.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.