शिंदे साहेबांचा गेम करणा-यांचा निषेध! एनसपी कार्यालय फाेडले

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान झाले. आज (साेमवार) सकाळपासून मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.
शिंदे साहेबांचा गेम करणा-यांचा निषेध! एनसपी कार्यालय फाेडले
ncp office satara

सातारा : एनसीपीचे (ncp) आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांचा जिल्हा बॅंक निवडणुकीत एक मताने पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी नाराजीतून सातारा जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय फाेडले. यावेळी समर्थकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टाेपली दाखविणा-यांचा निषेध नाेंदविला.

ncp office satara
सांगली DCC त महाविकास ६, भाजप १, काॅंग्रेसला पराभवचा धक्का

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. त्यांना २४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली. ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयानंतर आमदार शिंदे यांचे समर्थकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयास लक्ष केले.

तेथे काही कार्यकर्त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. काहींनी काचा फाेडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांचा गेम करणा-यांना त्यांची जागा दाखवून देणार. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे एेकले जात नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी महिला आघाडीने देखील आजच्या निकालाचा निषेध नाेंदविला.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com