शशिकांत शिंदेंना हरविणा-या राजणेंसह जावलीकरांना राजे म्हणाले...!

शशिकांत शिंदेंना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील रांजणे यांनी दिला आहे.
शशिकांत शिंदेंना हरविणा-या राजणेंसह जावलीकरांना राजे म्हणाले...!
shivendraraje bhosale & dnyandev ranjane

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांचा ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी एक मताने पराभव केला. त्यानंतर रांजणे व त्यांच्या समर्थकांनी सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendrarajebhosale) यांचा सुरुची बंगला गाठला. तेथे रांजणे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे आशीर्वाद घेतले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांनी रांजणे आणि समर्थकांचे अभिनंदन केले.

shivendraraje bhosale & dnyandev ranjane
उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

यावेळी गुलालाच्या उधळणीत रांजणेंच्या समर्थकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना रांजणेंच्या वाहनावर नेले. तेथे कार्यकर्त्यांनी वाघ आला रे वाघ आला जावळीचा वाघ आला..., आमदार शिवेंद्रसिंहराजे आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा दिल्या.

त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ज्ञानदेव रांजणे यांचे पुष्पगुच्छा, सातारी कंदी पेढे देऊन अभिनंदन केले. त्यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शिवेंद्रराजेंचा जयघाेष केला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीतील कार्यकर्त्यांसह रांजणेंना आता पुढं हाेईल ते हाेईल विचार करायचा नाही असे नमूद केले.

दरम्यान रांजणे यांनी विजयाचे श्रेय जावलीकरांचे असून येणाऱ्या काळात आमदार शशिकांत शिंदे अथवा त्यांच्या बगलबच्च्यांनी जावळीत राजकीय क्षेत्रात गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com