सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जिल्ह्यातील प्रमुख नेते बिनविरोध निवडून आले आहेत.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!SaamTvNews

-- ओंकार कदम

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले  हे जिल्ह्यातील प्रमुख नेते बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, साताऱ्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्यामुळे या ठिकाणी निवडणूक लागली आहे. 

विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून कराड तालुक्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उदयसिंह उंडाळकर पाटील हे निवडणूक लढवत असून उदयसिंह उंडाळकर काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री विलास काकांचे पुत्र आहेत. त्यामुळे उंडाळकर गटाचा तसेच कराडमधील मातब्बरांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. यामुळे बाळासाहेब पाटलांचा मार्ग खडतर मानला जातोय. तर, दुसरीकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सुद्धा पाटण मधून तगडा उमेदवार समोर उभा ठाकला आहे.

शरद पवारांचे जिल्ह्यातील अत्यंत विश्वासू आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांना विजय मिळवायचा असेल तर जिकिरीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हाबँकेच्या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन संघर्ष टाळण्याची राज्यस्तरीय नेत्यांची भूमिका होती. परंतु ऐन वेळी नेमकं काय ठरलं हे कोणी समजू शकले नाही. जिल्हामध्यवर्ती बँकेची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी कुणीही शिवसेनेला विचारात घेतले नाही. त्यामुळे आम्ही लढत आहोत आणि नक्कीच विजय आमचाच होईल. ही सहकारातील निवडणूक होती. परंतु आता इथून पुढे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढेल.असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!
स्वातंत्र्यावर बोलण्याएवढी कंगना राणावत ची औकात नाही - राजू शेट्टी
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!
1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक; खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं - कंगना, पहा Video

राष्ट्रवादीचेच माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज भरला असून कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. ज्ञानदेव रांजणे हे आ.शिवेंद्रराजेंचे निकटवर्ती असून त्यांनी या आधीच आपल्याकडे संख्याबळ असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याने शशिकांत शिंदे यांना जिल्ह्याच्या राजकारणात वजन राखायचं असेल तर कोणत्याही प्रकारे या ठिकाणी विजय मिळवावा लागेल.

यामुळे आजी आणि माजी मंत्र्यांच्या प्रतिष्ठेच्या झालेले ह्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असुन यामध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणं औसुक्याचे ठरणार आहे. मात्र, सर्वसमावेशक पॅनल मधील उमेदवारच विजय होतील असा विश्वास बँकेचे चेअरमन आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

सातारा जिल्हामध्यवर्ती बँकेमध्ये भाजप आमदार शिवेंद्रराजे याना सोबत घेऊन राष्ट्रवादी ने संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केले परंतु त्याला मर्यादित यश मिळाले आहे. या सगळ्या प्रक्रियेत शिवेंद्रराजेंनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत जिल्हाबँकेच्या बरोबरच भविष्यातील राजकीय गणिते सुद्धा सोपी केली आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com