ED Notice: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्या वर ईडी ने कारवाई केल्यावर सातारा जिल्ह्यात मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी या नोटीस बाबत खुलासा केला आहे.
ED Notice: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा
ED Notice: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा खुलासाओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : काही दिवसांपूर्वी कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्या वर ईडी ने कारवाई केल्यावर सातारा जिल्ह्यात मोठा गोंधळ उडाला होता. या कारखान्याने कारखाना पुनर उभारणी साठी सातारा जिल्हामध्यवर्ती बँके कडून कर्ज घेतले असल्याने आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आली असून कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यासाठी नेमके किती कर्ज वितरित करण्यात आले. याबाबतचा खुलासा ईडीच्या नोटीस मध्ये करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे Rajendra Sarkale यांनी या नोटीस बाबत खुलासा केला आहे. Satara District Central Bank Chief Revealed about ED notice

सातारा Satara जिल्हा मध्यवर्ती बँक District Central Bank ही देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक आहे. या बँकेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. शेतकऱ्यांचे Farmers हित जोपासणारी बँक म्हणून या बँकेची सहकार क्षेत्रात ओळख आहे. असे असताना अचानक इडी ED ने नोटीस दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 2017 पासून या कारखान्यासाठी 128 कोटीचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. कारखान्याकडे 97 कोटी 37 लाख कर्ज शिल्लक आहे.

जरंडेश्वर शुगर Jarandeshwar Sugar कडून वेळेत कर्ज Debt फेडले जात आहे का ? नेमके किती कर्ज वितरीत करण्यात आले आहे, याविषयीची माहिती ईडी कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. सद्या जिल्हा बँक ही सुस्थितीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com