उदयनराजेंच्या बिनविराेधानंतर सातारा DCC त 'यांनी' मारलं मैदान

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची आज (साेमवार) मतमाेजणी झाली.
उदयनराजेंच्या बिनविराेधानंतर सातारा DCC त 'यांनी' मारलं मैदान
shivendraraje bhosale ramraje naik nimbalkar balasaheb patil

सातारा Satara DCC bank election 2021 candidates list : खासदार उदयनराजे भाेसले यांनी सातारा (satara)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) निवडणुकीत बिनविराेध हाेऊन सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात धक्का दिला. त्यानंतर आज लागलेल्या निवडणुकांच्या निकालात राष्ट्रवादी काॅंग्रेसला धक्का बसल्याने राष्ट्रवादीचे समर्थकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नंदुकमार माेरे यांना पराभवास सामाेरे जावे लागले. काेरेगाव येथे सुनील खत्री हे चिठ्ठीद्वारे विजयी झाले. तेथे राष्ट्रवादीच्या शिवाजीराव महाडीक यांचा पराभव झाला. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार राज्याचे सहकारमंत्री बाळाासाहेब पाटील यांनी काॅंग्रेसचे उदयसिंह पाटील यांचा पराभव करुन (कै.) विलासराव पाटील उंडाळकर गटास धक्का दिला. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देखील पराभवचा झटका बसला आहे. satara district central co-operative bank election result final list

shivendraraje bhosale ramraje naik nimbalkar balasaheb patil
दिग्गजांचा जयंतरावांकडून करेक्ट कार्यक्रम; महाविआ १७, भाजप ६

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान झाले. या बॅंकेच्या १९६४ मतदारांपैकी १८९२ मतदारांनी आपला हक्क बजावला हाेता. आज (साेमवार) सातारा शहरात बॅंकेच्या निवडणुकीची मतमाेजणी झाली. यामध्ये बहुतांश ठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. परंतु महत्वाच्या ठिकाणी त्यांच्या उमेदवार पराभव झाला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक मंडळ

बिनविरोध संचालक

बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा.

ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, फलटण.

खासदार उदयनराजे भोसले, सातारा.

आमदार मकरंद पाटील, वाई.

नितिन पाटील, वाई.

राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वर.

दत्तानाना ढमाळ, खंडाळा.

अनिल देसाई, माण.

शिवरूपराजे खर्डेकर, फलटण.

लहूराज जाधव, कराड.

सुरेश सावंत, सातारा.

विजयी उमेदवार

ज्ञानदेव रांजणे, जावली.

माजी आमदार प्रभाकर घार्गे, खटाव.

शेखर गोरे, माण.

सत्यजित पाटणकर, पाटण.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कराड

सूनील खत्री, कोरेगाव.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, खटाव.

रामभाऊ लेंभे, कोरेगाव.

कांचन साळुंखे, सातारा.

ऋतुजा वाठारकर, कराड.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com