जवान मंदार नलवडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

देशसेवा बजावीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
Mandar Nalwade
Mandar NalwadeSaam Tv

सातारा: खटाव (Khatav) गावचे सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान मंदार मानसिंग नलवडे (वय- ३२) यांचा ५ वाजेच्या सुमारास देशसेवा बजावीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांना रात्री उशिरा साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला आहे. जवान मंदार यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात शासकीय (Govt) इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले आहे.

हे देखील पाहा-

वेटणे (Vetane) येथील मंदार नलवडे १२ वर्षापूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल जी. डी. पदावर नोकरीस रुजू झाले होते. बरेच दिवस मुंबई (Mumbai) येथील न्हावाशेवा बंदरावर ड्युटी करत होते. बुधवरी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारपासून पार्थिव वेटणे येथे येणार असल्याने गर्दी जमायला सुरुवात झाली. रात्री उशिरा ११ वाजता मंदार याचे पार्थिव गावात (village) आल्यावर कुटुंबीयांनी (family) हंबरडा फोडला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. अंत्यदर्शनाकरिता जनसमुदाय लोटला होता. मंदार नलवडे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा उपस्थितांनी देत होते.

Mandar Nalwade
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

सातारा पोलीस दलाच्या जवानांनी बिगुल वाजवून व बंदूकीच्या ३ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मंदार यांची पत्नी, लहान मुलगा, आई वडिल व लहान भाऊ यांनी अंत्यदर्शन घेतले आहे. सर्व धार्मिक विधी झाल्यावर जवान मंदार यांच्या पार्थिवास वडिल मानसिंग यांनी अग्री दिला . त्यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com