एसटी कर्मचारी संपावर आजही ठाम; सातारा- पुणे शिवशाही सेवा सुरु
MSRTC Bus

एसटी कर्मचारी संपावर आजही ठाम; सातारा- पुणे शिवशाही सेवा सुरु

सातारा येथून एसटी महामंडळाची एकही बस सुटलेली नाही.

सातारा ST Strike latest news : सातारा येथील राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी आजही त्यांच्या संपावर ठाम आहेत. आमची मागणी ही महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण अशी आहे. पगारवाढ नाही. त्यामुळे आमचे आंदाेलन सुरुच राहणार आहे असे एसटी कर्मचा-यांनी स्पष्ट केले. सातारा येथून एकही बस सुटलेली नाही असेही कर्मचा-यांनी नमूद केले. दरम्यान सातारा पुणे ही शिवाशाही बसची नियमीत सेवा तासातासाने सुरु असल्याची माहिती सातारा आगार विभाग प्रमुख रेशमा गाडेकर यांनी दिली.

MSRTC Bus
जय महाराष्ट्र! आदिती स्वामीस राष्ट्रीय धनुर्विद्येत राैप्य

मुंबई येथे आमदार गाेपींचद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खाेत यांनी एसटी कर्मचारी यांचे आंदाेलन स्थगीत झाल्याची माहिती दिली. परंतु सातारा येथील कर्मचारी आजही संपावर ठाम राहिले आहेत. त्या दाेघांनी अंग काढून घेतले असेल परंतु आम्ही संप मागे घेणार नाही. आमची मागणी शासनात विलीनीकरण करा ही आहे पगार वाढ नाही.

सातारा येथील सर्व बसेस बंद राहतील. जनतेची आणि कर्मचारी यांची सरकारने धुळफेक केली आहे. फक्त कनिष्ठ कर्मचारी यांना ४१ टक्के पगार वाढ मिळाली आहे. अन्य कर्मचा-यांना काही मिळालेली नाही. ३० वर्षानंतरच्या कर्मचा-यांसाठी काहीच दिलेले नाही. याचा अर्थ ते ज्येष्ठ आहेत ती त्यांची चूक आहे का असा प्रश्न कर्मचारी विचारातहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com