
ओंकार कदम, प्रतिनिधी
Satara Pusesavali Dispute: सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील खटाव तालुक्यात (Khatav) असणाऱ्या पुसेसावळी (Pusesawali) शहरात रविवारी (10, सप्टेंबर) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही गट आमने- सामने येत दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले.
या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाकडून तातडीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी आता सोशल मीडियावर (Social Media Post) पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या २३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जाळपोळ, खून, तोडफोड,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान,जीवे मरणाचा प्रयत्न आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरण असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरात अद्याप तणावाची परिस्थिती असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.