Satara Pune Highway : चहासाठी टपरीवर थांबले, पण थेट मृत्युने गाठलं; भीषण अपघातात दोघांनी गमावला जीव, ५ जखमी

सातारा-पुणे महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने चहाच्या टपरीजवळ थांबलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
Satara Pune Highway Accident
Satara Pune Highway Accident Saam TV

Satara Pune Highway Accident News : सातारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सातारा-पुणे महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने चहाच्या टपरीजवळ थांबलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Satara Pune Highway Accident
Kasba-Chinchwad Results : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीची आज मतमोजणी; कोण उधळणार गुलाल? उत्सुकता शिगेला

सातारा-पुणे महामार्गावरील पारगाव परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांमध्ये १५ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे महामार्गावर पारगाव येथे रस्त्यालगत चहाची टपरी असून बुधवारी रात्री काही प्रवासी तिथे चहा पिण्यासाठी थांबले होते. तिथून जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने टपरीजवळ थांबलेल्या एका कारला धडक दिली. यानंतर ट्रकने तिथे थांबलेल्या आणखी काही वाहनांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Satara Pune Highway Accident
Udayanraje Bhosale News : दोन दिवसात धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा.., उदयनराजेंचा सरकारला इशारा

हा अपघात ऐवढा भीषण होता, की कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी खंडाळा येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेनंतर ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com