
Udayanraje Bhosale News : कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ६० वर्षांपासून प्रलंबित आहेत. कृष्णा खोरे अंतर्गत जेवढी धरणे झाली त्यात धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा व कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दोन दिवसात धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा कोयनेची वीज बंद करणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनाला दिला आहे. (Latest Marathi News)
खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी कोयनानगर येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्त्वाखाली दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या कोयना धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.
काय म्हणाले उदयनराजे भोसले?
कोयना प्रकल्पग्रस्तांविषयी मला वेदना होतात. वेदना होतात कारण आज ६० वर्षे होऊनही धरणग्रस्तांचा हा प्रश्न डॉ भारत पाटणकर यांच्याकडून मांडला जात आहे. कृष्णा खोरे प्रकल्पाचा उपाध्यक्ष असतानाही वेगळ्या कल्पना सुचला होत्या. त्यावेळी लोकांचे भले होईल असंही त्यावेळी वाटत होते. जो पर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत वीज देणार नाही. तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे असं मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले. (Maharashtra Political News)
पुढे बोलताना उदयराजे म्हणाले, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे होता. आज तुमच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जामीन देऊन त्याग केला.कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना एक कल्पना सुचली. पाणी आडवले तर लोकांचे भले होईल, आज जेवढी धरणे झाली त्यामध्ये या धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे.
अगोदर जन्माला आलो असतो तर हा प्रश्न मागेच सुटला असता. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे होता. आज तुमच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जामीन देऊन त्याग केला. आज सहा तप गेले पण, न्याय मिळाला नाही. यामुळे तुमची प्रगती थांबली. त्या वेळेस एका बाजूला धरण तर दुसर्या बाजूला पुर्नवसन हा निर्णय घेतला पाहिजे होता, डॉ भारत पाटणकर यांनी शासनाकडे अनेकदा व्यथा मांडली.
डॉ भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून यापुढे मी ही लढाई तुमच्या साथीने लढणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लवकरच या बाबतीत बैठक लावून हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर ही काही तोडगा नाही निघाला तर शेवटचा पर्याय हा असेल की ज्या धरणग्रस्थानच्या व कोयना धरण च्या जीवावर संपूर्ण राज्य आज प्रगतीपथावर आहे त्या धरणाची सूत्र हाती घेण्यास आम्हास वेळ लागणार नाही.दोन दिवसात प्रश्न सोडवा अन्यथा कोयनेची वीज बंद करणार असल्याचा इशारा उदयनराजेंनी दिला.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.