Satara: दराेडेखाेराचा पाेलीसांवर हल्ला; एलसीबीच्या पथकाने जीवाची पर्वा न करता केले त्याला जेरबंद

गेल्या दहा वर्षांपासून पाेलीसांना गुंगारा देत हाेता अट्टल गुन्हेगार.
Satara: दराेडेखाेराचा पाेलीसांवर हल्ला; एलसीबीच्या पथकाने जीवाची पर्वा न करता केले त्याला जेरबंद
satara, satara crime news, satara police, satara breaking newssaam tv

सातारा : गेल्या दहा वर्षांपासून पाेलीसांना (police) विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या आराेपीस अटक (arrest) करण्यात आज (गुरुवार) सातारा पाेलीस (satara police) दलाच्या स्थानिक गु्न्हे शाखेस यश आले आहे. संशयित आराेपीचे नाव संजय नमण्या पवार असे असून त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाच गंभीर गुन्ह्यात ताे गेल्या दहा वर्षांपासून फरार हाेता. (satara latest marathi news)

संजय नमण्या पवार हा सासवड झणझणे (ता. फलटण) येथील माळीबेन वस्ती वडाचा मळा येथे असल्याची माहिती फलटण ग्रामीण पाेलीसांना मिळाली हाेती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या अंमलदार आणि पाेलीसांवर त्याने दगडफेक करुन तलावर व काेयत्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. त्याबाबत त्याच्या खूनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. त्यानंतरही त्याने सातारा जिल्ह्यात विविध गुन्हे केले हाेते. त्याच्यावर सन 2012 पासून जिल्ह्यातील लाेणंद, खंडाळा, फलटण ग्रामीण आदी ठिकाणी खून, खूनाचा प्रयत्न, दराेडा असे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल हाेेते.

satara, satara crime news, satara police, satara breaking news
व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा

सातारा पाेलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेस संजय नमण्या पवार यास भुरकरवाडी गावाच्या परिसरात शस्त्रांसह असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार आज (गुरुवार) पाेलीसांनी घटनास्थळी जाऊन त्यास सापळा लावूऩ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने एलसीबीच्या पथकावर हल्ला चढविला. पाेलीसांनी त्यांच्या जिवाची परवा न करता त्यास अत्यंत शिताफीने पकडले. त्याच्यावर या हल्ला संदर्भात लाेणंद पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

satara, satara crime news, satara police, satara breaking news
साता-याच्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उदयनराजेंची दिल्लीतून प्रतिक्रिया, म्हणाले...!

ही कारवाई एलसीबीच्या पथकाने पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पाेलीस अधीक्षक अजित बाे-हाडे यांच्या सूचनेनूसार पाेलीस निरीक्षक किशाेर धुमाळ, सहायक पाेलीस निरीक्षक रमेश गर्जे, पाेलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पाेलीस हवालदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ संकपाळ, संताेष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संताेष सपकाळ, कांतीलाल नवघने, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, गणेश कापरे, शिवाजी भिसे, अमाेल माने, वैभव सावंत, विशाल पवार, राेहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, गणेश कचरे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

satara, satara crime news, satara police, satara breaking news
News Labour Code : एक जूलैपासून चार दिवस काम? नवीन कामगार कायद्यामुळं पगार, पीएफमध्ये माेठे बदल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com