उदयनराजेंवरुन शशिकांत शिंदे म्हणाले, 'आम्ही इतकं दुधखूळे नाही'

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा नुकताच सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत नुकताच पराभव झाला.
उदयनराजेंवरुन शशिकांत शिंदे म्हणाले, 'आम्ही इतकं दुधखूळे नाही'
Udayanraje Bhosale Shashikant Shinde

सातारा shashikant shinde latest news : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमाेर त्यांचा नेमका का पराभव झाला याबाबत त्यांचे विचार मांडताना आमदार शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता तसेच भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना खासदार उदयनराजे भाेसले यांना पॅनलमध्ये कसे घेतले गेले असा प्रश्न विचारला आहे.

Udayanraje Bhosale Shashikant Shinde
उदयनराजेंच्या बिनविराेधानंतर सातारा DCC त 'यांनी' मारलं मैदान

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले ज्यांना आम्ही विराेध केला असं दाखविले गेले त्या खासदार उदयनराजे भाेसले यांना पॅनलमध्ये घेतले गेले. त्यांना सातत्याने माध्यमातून विराेध केला जात हाेता. मग असं अचानक काय घडलं की महाराष्ट्रातील इतर काेणत्या नेत्याची जादूची काडी फिरवली गेली की उदयनराजेंना बिनविराेध करावे लागले. एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन बिनविराेध हाेता. ज्यांच्याशी वाद आहेत त्यांना घेऊन तुम्ही बिनविराेध करता. दूस-या बाजूला पाच वर्ष तुमच्यासाेबत चांगला प्रकारे संबंध ठेवले. त्याला म्हणजे मला न घेण्याचे ठरविले गेले. इतके राजकारण कळण्यासारखे आम्ही दुधखूळे नाही. परंतु फसवून पाडण्याचा प्रयत्न केला हे चुकीचे आहे असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान आमदार शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर पराभवाचे खापर फाेडले. परंतु सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील आपण काय करताे याचा गांभीर्याने विचार करावा असेही नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com