प्रातांधिकारी शिवाजीराव जगतापांना धक्काबुकी; युवकाचे कृत्य

या प्रकरणाचा तपास फलटण पाेलिस करीत आहेत.
crime News
crime News

सातारा : प्रातांधिकारी डाॅ. शिवाजीराव जगताप (shivajirao jagtap) यांना युवा वाळू तस्काराने धक्काबुकी करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच फलटण तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे सातारा (satara) शासकीय कर्मचा-या वाळू तस्करांचा निषेध नाेंदवू लागले आहेत. धक्काबुकी करणा-या युवकावर फलटण (phaltan) पाेलिसांनी गुन्हा नाेंद केला आहे.

प्रांताधिकारी डाॅ. जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनूसार फलटण शहर पाेलिसांनी फलटण येथील मंगळवार पेठेतील झिरपे गल्लीमधील कैलास महादेव ननावरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयीन कामकाजा संदर्भातील एक बैठक संपल्यानंतर परताना प्रातांधिकारी डाॅ. जगताप यांना जाधववाडीतून फलटणकडे जाणारा वाळूचा ट्रक दिसला.

crime News
मलकापूरात टाेळक्याने विश्वास येडगेला भाेसकले

त्यावेळी डाॅ. जगताप यांनी संबंधित ट्रकचा संशय आल्याने त्याच्या जवळ जाऊन चाैकशी करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी कैलास ननावरे याने त्यांच्या कामात अडथळा आणत धक्काबुकी केली. दरम्यान ननावरे याच्यावर शहर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाेलिस उपनिरिक्षक श्री. शिंदे यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com