Kass Plateau : कास परिसरातील अतिक्रमणं प्रशासनाच्या रडारावर; मिळकतधारक चिंतेत

नाेटीसा बजावल्या जातात परंतु त्यानंतर कास परिसरातील हॉटेल सुरुच राहतात.
satara, kass plateau, encroachment
satara, kass plateau, encroachmentsaam tv

Kass Plateau : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास आणि परिसरातील मिळकतधारकांना त्यांनी केलेली अतिक्रमण तातडीनं हटवावीत अशा प्रकारची नाेटीस सातारा तहसिलदार कार्यालयाने अतिक्रमण केलेल्या मिळकतधारकांना बजावल्या आहेत. दरम्यान अतिक्रमण न काढल्यास प्रशासनास कारवाईचा बडगा उगारेल असं देखील मिळकतधारकांना बजावलेल्या नाेटीसीत नमूद करण्यात आलं आहे. यामुळे यवतेश्वरपासून कास पठारपर्यंतच्या मिळकतधारकांत पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत. (Satara Latest Marathi News)

कास (Kass) परिसरातील मिळकतधारकांना नाेटीसा बजावल्यानंतर प्रशासन कठाेर कारवाई करणार की पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी चर्चा देखील पर्यावरणप्रेमीत रंगली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यापुर्वी देखील प्रशासनानं येथील हाॅटेल व्यावसायिकांवर कारवाई करीत अतिक्रमण असलेला भाग सील केला हाेती. परंतु काही दिवसांनी सार काही पुर्ववत सुरु झालं.

satara, kass plateau, encroachment
Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह

आता पुन्हा प्रशासनानं मिळकतधारकांना नाेटीस बजावली आहे. आत्ताच्या नाेटीसीत तातडीने अतिक्रमण न काढल्यास प्रशासन कठाेर कारवाई करेल आणि त्यानंतर हाेणार खर्च मिळकतीवर बाेजा म्हणून चढवेल असं म्हटलं आहे.

satara, kass plateau, encroachment
Satara : बहिणीस त्रास दिल्यानं पाडेगावातील युवकाचा खून; लाेणंद पाेलिसांनी काैशल्याने केलं चाैघांना अटक

दरम्यान यवतेश्वरपासून कास पठार पर्यंत अनेक अतिक्रमण असून प्रत्येक वेळेस कारवाईचा दिखावा केला जातो. आता पुन्हा प्रशासनानं संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. परंतु केवळ नोटीसा न बजावता सरसकट अतिक्रमणे काढावीत अन्यथा हरित न्यायालयात जनहित याचिका दाखल करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिका-यांना एका निवेदनाव्दारे दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

satara, kass plateau, encroachment
Sangli : १४ फुटी मगर दिसताच तरुणांनी केलं धाडस, पण...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com