साताऱ्यात राडा; नगरसेवकाच्या समर्थकांनी युवकास चाेपले, ६ गंभीर
fighting

साताऱ्यात राडा; नगरसेवकाच्या समर्थकांनी युवकास चाेपले, ६ गंभीर

सातारा : एका नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयासमाेर वाहन लावल्याने त्याच्या गटातील समर्थकांनी एका युवकास मारहाण केली. त्यानंतर संबंधित युवकाने त्याची गॅंग बाेलावून मारहाण fighting करणा-यांशी पंगा घेतला. त्यानंतर झालेल्या राड्यात एकूण सहा जण गंभीर झाल्याची माहिती समाेर येत आहे.

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कायदा व सुवव्यवस्था चाेख राहावी यासाठी बुधवारी पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गणेशाेत्सव मंडळाच्या पदाधिका-यांसह शांतता कमिटीची बैठक येथील पाेलिस करमणुक केंद्र येथे घेतली. या बैठकीत एसपींनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. या सूचना देऊन काही तास उलटत नाहीत ताेच साता-यातील दाेन गटात सायंकाळी धुमश्चक्री झाली.

fighting
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

एका युवकाने नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयाबाहेर वाहन लावले. त्याचा राग मनात धरुन नगरसेवकाच्या समर्थकांनी त्याला चाेपले. त्यामुळे संबंधित युवकाने त्याची गॅंग बाेलावून तेथेच राडा केला. या राड्यानंतर सहा जण गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची पाेलिसांनी गंभीर दखल घेतली. प्राथमिक माहितीनुसार मारामारीत सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com