'जे काय करायचं ते रणांगण आल्यावर...'; धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

'कोल्हापूरचा विकास करणं आणि कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं हे आमचं ठरलंय'
'जे काय करायचं ते रणांगण आल्यावर...'; धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया
Dhananjay Mahadik And Satej PatilSaam TV

सांगली : रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं ही माझी सवय आहे. असं म्हणत काँग्रेसचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयावर पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हा परिषद, महापालिका निवडणूका अजुन लांब आहेत, सगळ्याच निवडणुका अजून लांब आहेत, ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही त्या निवडणुकीत कसं उतरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.

कोल्हापूरचा (Kolhapur) विकास करणं आणि कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं हे आमचं ठरलंय, असंही सतेज पाटील म्हणाले. सांगली शहरातील झुलेलाल चौक येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाचे अनावरण सतेज पाटील (Satej Patil) यांच्या हस्ते झाले यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे देखील पाहा -

यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यसभेच्या अनुभवातून आम्ही काही गोष्टी शिकलोय, विधान परिषदेमध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. महाविकास आघाडीचे सगळे आमदार विधान परिषदमध्ये आमच्या बरोबर राहतील असा मला विश्वास आहे असंही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com