Satyajeet Tambe : पक्षीय कारवाईनंतर तांबेंचे मोठे विधान; म्हणाले, आम्ही जोडलेल्या माणसांना...

माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा मुलगा उदयन गडाख याचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे पार पडला. यावेळी सत्यजित तांबे यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते.
satyajeet tambe
satyajeet tambesaam tv

सचिन बनसोडे

Satyajeet Tambe News : काँग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांचे निलंबन केले असले तरी प्रचारादरम्यान अनेक काँग्रेस कार्यकर्ते सत्यजित तांबे यांच्यासोबत दिसून येत आहेत. याबद्दल तांबे यांना विचारले असता पक्षीय कारवाईने आम्ही जोडलेल्या माणसांना काहीही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

satyajeet tambe
Maharashtra Politics : राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047ची वाट पहावी; भाजप नेत्याची खोचक टीका

माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा मुलगा उदयन गडाख याचा विवाह अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सोनई येथे पार पडला. यावेळी सत्यजित तांबे यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. निलंबन कारवाईनंतरही प्रचारादरम्यान अनेक काँग्रेस (Congress) कार्यकर्ते सत्यजित तांबे यांच्यासोबत दिसून येत आहेत.

याबद्दल बोलताना तांबे म्हणाले की, काम करताना आम्ही कुठलाही पक्षीय भेदाभेद पाळलेला नाही. त्यामुळे जी माणसे आम्ही मनाने जोडली आहे. त्या माणसांना पक्षीय कारवाईने कुठलाही फरक पडणार नाही.

satyajeet tambe
Pune Crime : नात्याला काळीमा! काकानेच केला दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार; पुण्यातील संतापजनक घटना

गेल्या पंधरा वर्षांपासून वडील सुधीर तांबे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असून पदवीधर शिक्षकांचे  प्रश्न मार्गी लावले आहेत. पाचही जिल्ह्यातील लोकांचे मन जिंकण्याचे काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे मला देखील प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com