BJP Offered Satyajeet Tambe : काँग्रेसचा युवा नेता भाजपच्या गळाला ? अखेर सत्यजीत तांबे म्हणाले, आमचं ठरलं...

उद्या काॅंग्रेसकडून विद्यमान आमदार तांबे यांचा अर्ज भरला जाणार असल्याची चर्चा आहे.
satyajeet tambe, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
satyajeet tambe, maharashtra legislative council graduate and teachers constituency election saam tv

- सचिन बनसाेडे

Satyajeet Tambe Latest Marathi News : राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी (maharashtra legislative council graduate and teachers constituency election) सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी देण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. या चर्चेस आज सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांनी स्वत:हून पुर्णविराम देत काेण काय म्हणते यापेक्षा मी काॅंग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे हे सर्वांना माहित असल्याचे म्हटले आहे. (Breaking Marathi News)

satyajeet tambe, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
Maharashtra News : शिंदे- फडणवीस सरकारवर माेठा दबाव टाकण्याचे शिक्षकांचे प्लॅनिंग; जाणून घ्या कारण

युवा नेते सत्यजित तांबे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले भाजपाकडून (bjp) ऑफर असल्याची सर्व चर्चा निराधार आहे. मी भाजपात प्रवेश करणार असल्याची आवाई उठवली गेली आहे. मी माझ्या (congress) पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि राहणार.

satyajeet tambe, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
Cotton Price Per Quintal : कापसाचा दर वाढला, उत्पादकांत चैतन्य; जाणून घ्या प्रतिक्विंटलला मिळणारा भाव

नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी काँग्रेसकडून आमदार डाॅ. सुधीर तांबे उद्या दुपारी दोन वाजता अर्ज दाखल करणार असल्याची खात्रीशिर माहिती सुत्रांकडून समजली आहे. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनाच पक्षाकडून उमेदवारी जाहीर हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

satyajeet tambe, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
Saam Impact: सरकारला घ्यावी लागली साम टीव्हीच्या 'त्या' बातमीची दखल, शेतकऱ्याला मिळाला न्याय

या निवडणुकीत भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतचा संभ्रम अजूनही मतदारसंघात कायम आहे. यंदा भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांना उमेदवारी मिळू शकले अशी जाेरदार चर्चा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com