Maharashtra Legislative Council Elections : सत्यजीत तांबेंच्या ट्विटने सस्पेन्स वाढला; माध्यमांना टाळत तांबे पिता-पुत्र नाशिकला रवाना

सत्यजीत तांबेंची आज दुपारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद होणार आहे.
Nashik, Maharashtra Legislative Council Elections, Satyjeet Tambe, BJP
Nashik, Maharashtra Legislative Council Elections, Satyjeet Tambe, BJPsaam tv

- सचिन बनसाेडे

Maharashtra Legislative Graduate Constituency Election Latest Updates : राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विराेधकांची युद्धपातळीवर रणनिती सुरु असल्याचे चित्र आहे. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे हे आज अर्ज भरणार आहेत. दरम्यान भाजपाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. काॅंग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे हे भाजपच्या वाटेवर असल्याची आजही चर्चा आहे. त्यातच सत्यजीत तांबे यांनी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त केलेले ट्विट यामुळे नाशिक (nashik) शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील (Maharashtra Legislative Graduate Constituency Election) भाजपच्या उमेदवाराचा सस्पेनस कायम राहिला आहे.

Nashik, Maharashtra Legislative Council Elections, Satyjeet Tambe, BJP
Maharashtra Politics : 'भाजपात येतो अशी केवळ त्यांची हवा अन् त्यांनी पक्षात आलेले कार्यकर्त्यांना आवडणार नाही'

नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी (election) काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे हे आज दुपारी २ वाजता नाशिक येथे अर्ज भरणार आहेत. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या स्मृतीस्थळी जात तांबे यांनी अभिवादन केले. युवा नेेते सत्यजीत तांबे देखील डॉ. सुधीर तांबे यांच्या समवेत उपस्थित हाेते.

Nashik, Maharashtra Legislative Council Elections, Satyjeet Tambe, BJP
Maharashtra News : शिंदे- फडणवीस सरकारवर माेठा दबाव टाकण्याचे शिक्षकांचे प्लॅनिंग; जाणून घ्या कारण

त्यानंतर दाेन्ही नेते वेगवेगळ्या वाहनांतून संगमनेरहून नाशिकला रवाना झाले. यावेळी माध्यमांनी त्यांनी गराडा घातला परंतु तांबे पिता-पुत्रांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. यावेळी त्यांच्या निकटवर्तींयांनी आज दुपारी चार वाजता नाशिक येथे तांबे यांची पत्रकार परिषद हाेईल अशी माहिती दिली.

Nashik, Maharashtra Legislative Council Elections, Satyjeet Tambe, BJP
Navi Mumbai Crime Branch : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून रिक्षा चोरणारी टोळी गजाआड

भाजप सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी देणार असल्याची चर्चा आजही नगर जिल्ह्यासह नाशिक मतदारसंघात आहे. भाजपने अद्यापही त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घाेषणा केलेले नाही. भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर न केल्याने तांबे यांच्याबद्दलचा सस्पेंन्स कायम राहिला आहे. त्यांच्या आजच्या ट्विटची देखील चर्चा हाेऊ लागली आहे. (Nashik Maharashtra Legislative Graduate Constituency Election)

दरम्यान डॉ. सुधीर तांबे हे मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) आजारी असल्याने डाॅ. तांबे हे साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. थोरात साहेब मतदारसंघात परतल्यावर मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार अशी माहिती तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com