लढवय्या जवानाचे धुमधडाक्यात स्वागत; ग्रामस्थांचा ऊर भरुन आला

लढवय्या जवानाचे धुमधडाक्यात स्वागत; ग्रामस्थांचा ऊर भरुन आला
santosh devre

सातारा : सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील अनेक जवान देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर कार्यरत आहेत. अनेकांनी शत्रूशी लढताना छाताडावर गाेळ्या देखील झेलल्या. अनेक जण देशसेवा बजावताना हुतात्मा झाले. या जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावातून घरा घरातून सैनिक तयार होत असतात. देशसेवा बजावून ते पुन्हा आपल्या गावी येतात. निवृत्तीनंतर गावी येणा-या जवानाचे ग्रामस्थ धडाक्यात स्वागत करीत असतात. सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणानजीक अतिदुर्गम भागामध्ये वसलेल्या सायळी या गावातील जवान नाईक संतोष देवरे santosh devre हे 4 मराठा लाईट इंफंट्रीमधून नुकतेच निवृत्त झाले. गावातील माजी सैनिक होण्याचा पहिला मान संतोष यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे धुमधडाक्यात स्वागत केले. (sayali-villagers-welcomed-indian-soldier-santosh-devre-satara-trending-news)

कोरोना विरहित गाव म्हणून सायळी गावाचा महाराष्ट्रात लौकिक आहे. हा सोहळा एका जवानाच्या नसून भारतीय सेनेचा गौरव पुरस्कारच म्हणावा लागेल अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

santosh devre
मराठा युवकांसाठी समरजीतराजे घाटगेंचा महत्वपुर्ण पुढाकार

जवान संताेष गावात येताच ग्रामस्थांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत त्यांची मिरवणूक काढली. गावाच्या दुतर्फा ग्रामस्थ उभे हाेते. फुलांच्या पाकळ्या अंगावर टाकून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात हाेते. बैलगाडीतून ते देखील गावक-यांना स्मितहास्य करुन हात उंचावून अभिवादन करीत हाेते. ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून आंनद ओसंडून वाहत होता.

देशासाठी वेळप्रसंगी आपले प्राण पणाला लावणाऱ्या जाँबाज सैनिकाचा सर्व गावकरी मिळून सन्मानित करतात आणि भव्यदिव्य मिरवणूक काढतात. खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे. यामुळेच पुढच्या पिढीला प्रोत्साहन मिळून सातारा जिल्हा हा वंश परंपरागत लढवय्या आहे. ही रित अखंड चालत राहिल याबाबत तिळमात्र शंका नाही अशी भावना येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com