वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून, डॉक्टरची केली फसवणूक!

महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून ओएलएक्स व इतर ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून एका डॉक्टरची फसवणूक केली आहे.
वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून, डॉक्टरची केली फसवणूक!
वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगूण, डॉक्टरची केली फसवणूक!SaamTv

बारामती : महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादकEditor असल्याचे सांगून ओएलएक्सOLX व इतर ऑनलाईन वेबसाईटवरOnline Website विक्रीसाठी कारचे फोटो टाकून एका डॉक्टरचीDoctor फसवणूक केली आहे याप्रकरणी महेश मच्छिंद्र कदम आणि प्रियांका जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Saying to be the editor of a news channel, cheating the doctor

हे देखील पहा-

सध्याच्या आधुनिक आणि डीडिटलDigital युगात कोण कशा प्रकारे कोणाला गंडा लावेल सांगता येत नाही. कधी फोन करुन बँकेतून बोलतोय तुमचा अमुक तमुक पासवर्डPassword सांगा म्हणून तर कधी एटीएम मधून ऑनलाईन पैसे काढून यामुळे सध्या व्यवहार हे अतिशय सतर्क राहून करायला हवेत हे मात्र नक्की असेच एक प्रकरण बारामती मध्ये घडले आहे.

प्रियांका जाधव यांच्या नावावर असलेल्या मारुती सुझुकीMaruti suzuki कंपनीची वॅगनार कारची विक्री करण्यासाठी ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर फोटो आणि माहिती अपलोडUpload केली. कार खरेदी करायची असल्याने फिर्यादीने बारामती येथे येऊन माहिती घेतली. तेव्हा कदम याने त्याच्याकडील या कारमध्ये बसवून गाडीची ट्रायल दिली व गाडीची कागदपत्रे दाखवली. त्यानंतर फिर्यादी व कदम यांच्यामध्ये या गाडीचा व्यवहार पाच लाख रुपये किमतीला ठरला. त्यातील चार लाख रुपये त्याच दिवशी व उरलेली एक लाख रुपये रक्कम ही गाडी खरेदी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले.

वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगूण, डॉक्टरची केली फसवणूक!
'मविआ' सरकारचे काम कळवा आणि बक्षीस मिळवा; पुणे भाजपची अभिनव स्पर्धा!

प्रियांका जाधवच्या खात्यावर फिर्यादीने चार लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदाराला गाडीमध्ये बसवून कदम याने बारामती येथील नवीन प्रशासकीय भवन शेजारील झेरॉक्स सेंटर मध्ये नेऊन गाडीच्या व्यवहाराची नोटरी करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळानंतर कदम याने फिर्यादीला प्रियांका जाधव हिला सही करण्यासाठी घेऊन येतो, असे सांगून त्या ठिकाणावरून वाहनासह तो निघून गेला. त्यामुळे या दोघांनी संगनमताने ही फसवणूक केली असल्यावरून ही फिर्याद दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Edited By-Jagdish Patil

Related Stories

No stories found.