Bank Viral Video: देवी अंगात आली अन् सरकारला श्राप देऊन गेली; बँकेत महिलेचा धिंगाणा, पाहा व्हिडिओ

महिलेच्या अचानक अंगात आल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Bank Viral Video
Bank Viral VideoSaam TV

SBI Bank Viral Video: अंगात येणं खरं की खोटं असा प्रश्न अनेकांना पडतो. महिलांच्या अंगात देवी आल्याचे आजवर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आता देखील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला आपल्या काही कामनिमित्त SBI बँकेत जाते. बँकेत गेल्यावर काही वेळाने ती अचानक संपूर्ण बँकेत घुमू लागते. महिलेच्या अचानक अंगात आल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. (Latest Political News)

अंगात येणं म्हणजे हा एक देवाचा प्रकार आहे असं म्हटलं जातं. मंदिरात अथवा कोणत्याही धार्मीक कार्यावेळी शक्यतो अंगात येण्याच्या घटना घडत असतात. मात्र चक्क बँकेत महिलेच्या अंगात आल्याने सर्वचजण चकित झाले आहेत. सदर महिला "लाडली बहना" या योजनेचा लाभ घेण्यासाठी आली होती. इथे आल्यावर ती रांगेत उभी राहिली. मात्र तिचा नंबर आल्यावर तिला योजनेचा लाभ घेता आला नाही.

Bank Viral Video
Parbhani Crime News: शाळेतून घरी जाताना तरुणाने छेड काढली; भररस्त्यात पोरीने पट्ट्यानेच झोडलं, व्हिडिओ Viral

महिलेने SBI बँकेत केव्हायसी केलं नव्हत त्यामुळे तिला योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या. यामुळे तिचा फार संताप झाला. महिला थोड्यावेळाने लाईनीतून बाहेर आली. तिने तिथेच घुमायला सुरुवात केली. महिलेला काही तरी होत आहे म्हणून सगळे तिच्याकडे पाहू लागले. तितक्यात तिचे केस सुटले. सुटलेल्या केसांमध्ये तिने रौद्र रुप धारण केलं.

केस मोकळे सोडून महिला जोरात घुमू लागली आणि मोठ्याने ओरडत सरकारवर टीका करु लागली. या महिलेने आपल्या शैलीत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. @SyedSho43211335 या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ५ जून रोजी व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "बँकेत आधार लिंक नसल्यामुळे लाडली बहना योजनेला विलंब होत असल्याने देवीने येऊन सरकारला शिव्याश्राप दिला." ४४ सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bank Viral Video
Crime News : सातारा, गाेंदिया, वाशिम, काेपरगावात पाेलिसांची धडाकेबाज कारवाई; गुटखा, पान मसाल्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com