सोलापूरातील तरुणाने साकारला शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेचा देखावा

शरद पवारांवरील असलेल्या प्रेमापोटी हा देखावा सौरभ भांडने या तरुणाने साकारला आहे.
सोलापूरातील तरुणाने साकारला शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेचा देखावा
सोलापुरातील तरुणाने साकारला शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेचा देखावाविश्वभूषण लिमये

सोलापूर : गणेशोत्सव म्हंटल की सर्वांना गणपती बाप्पांसोबतच ओढ लागते ती आरास करण्याची आणि देखावे तयार करण्याची आणि अशाच एका सोलापूरच्या (Solapur) उत्साही आणि शरद पवार (Sharad Pawar) प्रेमी युवकांने चक्क पवारांच्या गाजलेल्या, पावसात भिजलेल्या साताऱ्यातील(Satara) सभेचा देखावा तयार केला आहे.(Scene of Sharad Pawar's historic meeting)

हे देखील पहा-

सोलापुरातील गणेशभक्त सौरभ भांड यांच्या घरातील गणपती समोरचा देखावा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याच्या राजकारणात कधीही विसरली न जाणारी घटना आणि एका सभेमुळे राजकीय वातावरण (political atmosphere) बदलून टाकणारी अशी सभा म्हणून ज्या सभेची ओळख आहे ती म्हणजे सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांची पावसात भिजलेली सभा.

सोलापुरातील तरुणाने साकारला शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेचा देखावा
बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यात 'मविआ' सरकार अपयशी; भाजप महिला मोर्चाचा आरोप

या सभेत पवार पावसात भिजले होते. याचीच आठवण करुण देण्यासाठी शरद पवारांवरील असलेल्या प्रेमापोटी हा देखावा सौरभ भांडने या तरुणाने साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी सोलापुरातील नागरिकांची गर्दी सौरऊच्या घरी गर्दी पहायला मिळतं आहेत. तसेच शरद पवारांवरील असलेल्या प्रेमापोटी हा देखावा साकारला असल्याची भावना सौरभ भांडने व्यक्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com