गृहपाठ बंद केल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल का ? तज्ज्ञ म्हणतात...

गृहपाठ बंद करण्याचा निर्णय योग्य आहे का? याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल का? की नवीन समस्या निर्माण होतील? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
education news
education news saam tv

Nashik News : आपल्या शिक्षण (Education) पद्धतीवरून अनेक मत मतांतरे असतानाचं आता यात आणखी भर पडलीय, ती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लवकरच गृहपाठ बंद करण्याचा विचार असल्याच्या घोषणेची. आधीच पाहिले ते आठवीपर्यंत सर्व पास, सोपा अभ्यासक्रम, टक्केवारीची खिरापत त्यात आता गृहपाठ बंद. मात्र, खरच गृहपाठ बंद करण्याचा निर्णय योग्य आहे का? याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल का? की नवीन समस्या निर्माण होतील? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या विविध प्रश्नावर तज्ज्ञ मंडळींनी मते व्यक्त केली आहेत.

education news
Sharad Pawar: सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण; 'गृहपाठ'वरून शरद पवारांनी घेतली 'शाळा'

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी दप्तराच ओझ कमी करणं, सोपा अभ्यासक्रम अशा अनेक निर्णयांवरून शिक्षण क्षेत्रात मत भिन्नता असताना पुढील वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ बंद करण्याचा विचार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. हा धाडसी निर्णय झालेला नसला, तरी यावरून आतापासूनच वादाला तोंड फुटलं आहे. विद्यार्थ्यांवरील गृहपाठाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं शिक्षण मंत्री म्हणत असले, तरी याचे दूरगामी परिणाम काय होतील? यावरून शिक्षण क्षेत्रात संभ्रमावस्था पाहायला मिळतेय.

विद्यार्थ्यांवर गृहपाठाचा ताण असतो, हे जरी खरं असलं तरी थेट टोकाचा निर्णय घेत गृहपाठ बंद करण्याऐवजी गृहपाठाचं स्वरूप बदलणं, मुलांना लिहितांना आवडेल, विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देता येईल, असा गृहपाठ देता येईल का? अशा अनेक पर्यायांचा आधी विचार होणे गरजेच असल्याचं शिक्षण क्षेत्रातील तज्ञांना वाटतं. विद्यार्थ्यांवर गृहपाठाचा अतिरिक्त बोजा नको, हे सर्वमान्य असल, तरी थेट गृहपाठचं नको हा पर्याय ठरू शकत नाही, असं मत शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत

education news
राज ठाकरेंनी सांगितला अजय-अतुल यांच्या आईचा 'तो' किस्सा; महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचे केले वर्णन

मुलांना घरचा अभ्यास देण्यासाठी अनेकदा पालकही आग्रही असतात, तर अनेक मुलांनाही आवडीने गृहपाठ करायला आवडतो. जागतिक पातळीवरील शिक्षणाच्या दर्जाचा विचार करता गणित, इंग्रजी आणि अन्य काही विषय जिथे सरावाची गरज असते अशा विषयांना गृहपाठ बंद केला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचा काय परिणाम होईल.

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये इतकं परिपूर्ण शिक्षण दिलं जातं का की विद्यार्थ्यांना घरी सराव वा उजळणी करण्याची गरज नाही? शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज असली, तरी असे धाडसी निर्णय घेण्याआधी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, पालक सर्वांशी चर्चा करून धोरण ठरवायला हवं, असा सूर शिक्षण क्षेत्रात उमटतोय. सरकार, मंत्री, अधिकारी बदलले की धोरण बदलत, असा आजपर्यंतचा इतिहास असला, तरी शिक्षण क्षेत्राशी निगडित धोरणातील धरसोडवृत्ती शिक्षणाला बाधक ठरणार नाही, याचाही विचार होणे तितकंच गरजेचं आहे, असेही तज्ज्ञ म्हणतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com