15 जुलै पासून शाळांच्या घंटा पुन्हा वाजणार; 8 वी ते 12 वी शाळा सुरू

विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेत जाता येणार आहे.
15 जुलै पासून शाळांच्या घंटा पुन्हा वाजणार; 8 वी ते 12 वी शाळा सुरू
कोरोनामुक्त भागात शाळा सुरू, करण्याबाबतचा शासनाचा निर्णय मागेSaam Tv

नांदेड - जिल्ह्यात ८ वी ते १० वी पर्यंतच्या १ हजार ४५० शाळा School सुरू होणार आहेत. कोरोनामुळे दिड वर्षापासून शाळा बंद होत्या मात्र, कोरोनाचा Coronaप्रभाव कमी झाल्याने आता १५ जुलै पासून शाळांच्या घंटा पुन्हा एकदा वाजणार आहेत. नांदेड Nanded जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर Varsha Thakur यांनी तसे आदेश निर्गमित केले आहे.

शाळा बंद असल्याने ७० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित होते मात्र, आता वंचित विद्यार्थी प्रवाहात येणार आहेत.विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेत जाता येणार आहे.

हे देखील पहा -

नांदेडमध्ये Nanded कोरोनामुळे Coronaअनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहेत. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण Education पोहचविण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिले आहे.

कोरोनामुक्त भागात शाळा सुरू, करण्याबाबतचा शासनाचा निर्णय मागे
वरुणराजा आता तरी बरस रे; तिबार पेरणीमुळे शेतकरी दाम्‍पत्‍याची विष घेऊन आत्‍महत्‍या !

लॉकडाउनमुळे Lockdown शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजूरी, मुला-मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे अजून शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने ८ वी ते १२वी पर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील काही गावात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाकडून आढवा घेतला जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com