Nagpur News : स्कूलबस चालकाचं नियंत्रण सुटलं; चाकाखाली येऊन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

स्कूलबसच्या चालकाचं वाहनावरील नियत्रंण सुटल्याने बसने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. त्यानंतर बस विजेच्या खांबाला बस धडकली.
nagpur news
nagpur news Saam Tv

Nagpur Accident News : नागपूरमध्ये एका स्कूलबसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्कूलबसच्या चालकाचं वाहनावरील नियत्रंण सुटल्याने बसने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. त्यानंतर बस विजेच्या खांबाला बस धडकली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

nagpur news
Pune News : अरे चाललंय काय? पुण्यातील भूमकर पुलाजवळ २ तासांत दुसरा अपघात

नागपुरात (Nagpur) स्कूलबस नियंत्रण सुटलं त्यावेळी आठवीत शिकणारा १४ वर्षांचा सम्यक कळंबे या विद्यार्थ्याचा चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. मेरी पौसेपिन्स अकादमी या शाळेच्या बसचा हा अपघात झाला आहे. मंगळवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूने नागपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

nagpur news
Pune News: नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची लेन तोडून चारचाकी गाडीला धडक

अन् स्कूल व्हॅनचं चाक निखळलं

दरम्यान, नागपुरात मंगळवारी सकाळी देखील अपघाताची घटना घडली. सकाळी स्कूल व्हॅनचा अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे पुलावरून धावत असताना चाक निखळले. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने ब्रेक लावले. या झालेल्या अपघातात कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. ही स्कूल व्हॅन अपघातावेळी कोणत्याही वाहनाला धडकलं नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com