शाळा-महाविद्यालये नियम व अटींसह सुरू करावे; बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह पालक आक्रमक

स्कुल चले हम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...
शाळा-महाविद्यालये नियम व अटींसह सुरू करावे; बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह पालक आक्रमक
शाळा-महाविद्यालये नियम व अटींसह सुरू करावे; बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह पालक आक्रमकविनोद जिरे

विनोद जिरे

बीड : राज्य शासनाने (State Government) घालून दिलेल्या नियमाचे पालन करून, शाळा महाविद्यालय सुरू करावेत. या मागणीसाठी आज बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "स्कूल चले हम" आंदोलन करण्यात आले. (Beed News)

या आंदोलनात पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा सहभाग होता. सतत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक, शारिरीक आणि मानसिक खच्चीकरण होत असून भावीपिढी दिशाहीन होण्याची शक्यता, शिक्षण तज्ञांनी व्यक्त केली आहे.

शाळा-महाविद्यालये नियम व अटींसह सुरू करावे; बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह पालक आक्रमक
UAE: अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू !

यामुळे ग्रामीण भागातील सरसकट शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणाच्या व विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोणातुन चुकीचा ठरत असल्याचे मत पालकांचे असुन शाळा बंद या निर्णयाचा फेरविचार करून शासनाच्या कोरोना विषयक अटी व नियमांचे पालन करून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निविदेनाद्वारे केली आहे

बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना (Corona) प्रादुर्भाव नसल्यामुळे, ग्रामीण भागातील शाळा १०० टक्के सुरू कराव्यात आणि शहरी भागातील शाळा ५० टक्के शाळा सुरू करा. ज्या वेळी कोरोना प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होईल, तेव्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा. सरसकट शाळा बंद करू नयेत, अशी मागणी आंदोलक सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिक्षणतज्ञ मनोज जाधव यांनी केली.

हे देखील पहा-

ऑनलाइन शिक्षण (Online Learning) पद्धती ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना जमत नाही, आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याकडे अन्ड्राईड मोबाइल नसणे अथवा रेंज नसल्यामुळेच शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाने इतर ठीकाणी ५० टक्के क्षमतेचे लावलेले निकष, शाळा महाविद्यालयांना देऊन परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली.

बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू कराव्यात. अशी मागणी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com