बुलढाणा जिल्ह्यातील 910 शाळांपैकी 316 शाळांमध्ये उघडली पुस्तके
बुलढाणा जिल्ह्यातील 910 शाळांपैकी 316 शाळांमध्ये उघडली पुस्तकेSaam Tv News

बुलढाणा जिल्ह्यातील 910 शाळांपैकी 316 शाळांमध्ये उघडली पुस्तके

कोविड नियमांचे पालन करत गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

बुलढाणा - कोरानाचे सावट कमी होत असताना ज्या गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही अशा गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कोविड नियमांचे पालन करत गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये आठवी ते बारावी पर्यंत एकूण 910 शाळा आहेत. त्यांपैकी 316 शाळेमध्ये प्रत्यक्षात शिक्षण सुरू झाले असून या शाळेतील सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व नियमांची अंमलबजावणी करत हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. schools are opening in buldhana with following covid rules

हे देखील पहा -

ज्या शाळांमध्ये वर्ग सुरू झालेत त्यांना मागील वर्षाची उपलब्ध असलेले पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात आले आहे. ज्या गावातील शाळा अद्यापही सुरू नाहीत अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांना दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com