सोमवारपासून 'या' जिल्ह्यातील शाळा होणार सुरु

जिल्ह्यातील 8 वी ते 12 वी वर्गाच्या 335 गावातील शाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
सोमवारपासून 'या' जिल्ह्यातील शाळा होणार सुरु
सोमवारपासून या जिल्ह्यातील 8 ते 12 वी च्या शाळा होणार सुरु Saam Tv

विष्णूभूषण लिमये

सोलापूर: कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीमुळे मागच्या कित्येक महिन्यांपासून बंद असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शाळा आता सुरु होणार आहेत. येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील 8 वी ते 12 वी वर्गाच्या 335 गावातील शाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त गाव आणि ज्या गावामध्ये मागच्या एक महिन्यापासून एक ही कोरोना रुग्ण आढळला नाही अश्या 335 गावांमध्ये शाळा सुरु होणार आहेत.

दरम्यान,शाळा सुरु करत असताना शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी, शाळेचं सॅनिटायझेशन, होणं आवश्यक आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांमधून स्वागत केलं जातं आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आणि आस्थापना बंद होऊ लागल्या त्यात शाळा, कॅालेज होते. त्यानंतर रुग्ण संख्या कमी होऊन परत परिस्थिती पहिल्या सारखी होईल असे वाटत असताना कोरोनाची दुसरी लाट आली आणि महाराष्ट्र पुन्हा लॅाकडाऊनच्या दिशेने गेला. परंतू दुसरी लाट निवळल्या नंतर आता कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे सोलापूरातील प्रशासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com