Scooter Catches Fire: धावत्या स्कूटीने अचानक घेतला पेट; थरार सीसीटीव्हीत कैद, पाहा Video

Scooter Catches Fire In Alibaug: दुचाकीला अचानक आग लागल्याने बघ्यांची गर्दी जमली होती, त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.
Scooter Catches Fire In Alibaug:
Scooter Catches Fire In Alibaug: सचिन कदम

सचिन कदम

रायगड: अलिबाग शहरातील पीएनपीनगर समोरील रस्त्यावरुन चाललेल्या दुचाकीला (Scooter) खालील बाजूस अचानक आग (Fire) लागल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. ही बाब पादचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने दुचाकीवरून चाललेल्या व्यक्तीच्या लक्षात आणून दिली. दुचाकीवरील दोघेही लागलीच खाली उतरले. प्रथम पाणी आणि नंतर फायर फायटरच्या सहाय्याने आग ही विझवण्यात आली. त्यामुळे हा मोठा अनर्थ टळला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (Alibaug Latest News)

हे देखील पाहा -

दरम्यान दुचाकीला अचानक आग लागल्याने बघ्यांची गर्दी जमली होती, त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. दुचाकीला आग लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही. सध्या दुचाकीला आग लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. दुचाकील मॉडिफाईड करणे, त्यात लायटींग किंवा मोबाईल चार्जिंगसाठी सोय करणे यामुळे अनेकदा बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. दुसरं कारण म्हणजे इंधन गळतीमुळेही वाहनाला आग लागू शकते. त्यामुळे गाडीत कंपनीने दिली आहे तशीच वापरावी, त्यात कोणतेही बदल करु नये. सोबतच अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून वेळोवेळी सर्व्हिसिंग करावी.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com